
मनोवेधक कथानक, विनोद व अनोखे ट्विस्ट यांमुळे मालिका गुडिया हमारी सभी पे भारी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. पण आगामी कथा फक्त प्रेक्षकांसाठीच नव्हे तर दादी जियासाठी (नीला मुल्हेरकर) देखील मोठे सरप्राईज घेऊन येणार आहे. तिला समजते की, अमिताभ बच्चन शूटिंगसाठी सिपरीमध्ये येणार आहेत.


बिग बीला संरक्षण देण्याची मोठी जबाबदारी सांभाळणार आहे नन्हे (सुधीर नेमा). तो ही बातमी कुटुंबामध्ये सांगतो, तेव्हा सर्वजण खूपच आनंदित होतात. पण दादी सर्वात आनंदित होते. ती संपूर्ण जीवनभर बॉलिवुडच्या शेहनशाहला भेटण्याची वाट पाहत आली आहे. प्रेमात तल्लीन झालेली जिया महानायकाला भेटण्याचे स्वप्न पाहताना आणि प्रसिद्ध गाणी गुणगणताना दिसणार आहे.
अखेर जिया बिग बींना भेटेल का?
जाणण्यासाठी पाहत राहा ‘गुडिया हमारी सभी पे भारी‘ दर सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता
फक्त &TV वर

